बाणेर : सकल मराठा समाजाच्या वतीने औंध बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी सुस महाळुंगे बावधन परिसरातील मराठा समाजाच्या वतीने 29 ऑगस्ट जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलना संदर्भात बाणेर कुंदन गार्डन येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
संघर्ष येथे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुंबई येथे 29 ऑगस्ट रोजी होत असलेल्या आंदोलनामध्ये औंध बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी महाळुंगे बावधन परिसरातून हजारोच्या संख्येने मराठा समाज आंदोलनात सहभागी होणार आहे. याबाबत नियोजन बैठकीमध्ये ठराव करण्यात आले. गणेशोत्सवाचा कालावधी असल्याने मराठा समाजाने यंदाच्या वर्षी वेळप्रसंगी दीड दिवसाचा गणपती बसवावा अथवा यंदाचे गणपतीचे विसर्जन मुंबईला समुद्रात करावे परंतु आंदोलनाला जायचे असे एकमताने ठरवण्यात आले.
परिसरातील नागरिकांनी मराठा समितीच्या कडे आंदोलनाला जाण्यासाठी नाव नोंदणी करावी. आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांना जाण्याची व्यवस्था मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच आंदोलनादरम्यान मुंबईमध्ये जाण्यापासून रोखल्यास मिळेल त्या मार्गाने मराठा बांधवांनी आंदोलन स्थळे पोहोचावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
सरकारकडून फेक नरेटीव्ह सरकारमधील मराठा बांधवांच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो तसेच आंदोलन भरकटवण्यासाठी आंदोलनात अस सामाजिक तत्व घुसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या पार्श्वभूमीवर अफवांवरती विश्वास ठेवू नये. आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत असल्याने जरांगे पाटील सांगतील त्याच मुद्द्यांवर ठाम रहावे. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांना मदत करण्यासाठी परिसरातील मराठा बांधवांच्या वतीने नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी बैठकीमध्ये देण्यात आली.
आपल्या परिसरातील मराठा आमदार व खासदार यांनी मराठा समाजाची बाजू सरकारकडे मांडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या बैठकीला सुमारे 700 हून अधिक मराठा बांधव उपस्थित होते. आंदोलनामध्ये सत्ताधारी मराठा बांधवांनी समाज म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.