औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची गणेश विसर्जन घाटांची पाहणी; गणेश विसर्जन घाट भक्तीमय विसर्जनासाठी सज्ज

औंध : गणेश उत्सवानिमित्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने औंध बोपोडी बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील विसर्जन घाट स्वच्छ करण्यात आले तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी विसर्जन घाटांची तसेच गणेश विसर्जन हौदांची पाहणी केली.

प्रभाग नऊ मधील सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी मुळा नदी घाट, वाकेश्वर मंदिर पाषाण, सुतारवाडी जलतरण तलाव, आयटीआय मैदान पाषाण, जय भवानी नगर पाषाण, महाळुंगे स्मशानभूमी नदी घाट, प्रभाग क्रमांक आठ मधील औंध मलिंग घाट व राजीव गांधी ब्रिज, शांता आपटे घाट व महादेव मंदिर घाट बोपोडी गणपती विसर्जन करण्यात येणाऱ्या घाटांची व हौद ठेवण्यात आलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

गणेश विसर्जन घाटावरती औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आवश्यक ठिकाणी जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्युत व्यवस्था, निर्मल्य टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षित गणपती विसर्जन करावे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी निर्माल्य क्षेत्रीय कार्यालयाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्याकडे द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा -उद्योगमंत्री उदय सामंत