राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने सुस बाणेर बालेवाडी पाषाण प्रभाग नऊ मध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन; दोन लाखाचे प्रथम क्रमांकाचे भव्य पारितोषिक

बालेवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्यावतीने सुस बाणेर बालेवाडी पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पार्टीचे शहर उपाध्यक्ष संदीप धारूजी बालवडकर यांच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे यासाठी पहिले पारितोषिक २ लाख रुपये ठेवण्यात आले आहे.

बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तीन गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बाणेर बालेवाडी, सुस महाळुंगे, सुतारवाडी पाषाण, असे तीन गट असणार असून यामध्ये प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांना दुचाकी, फ्रिज व टीव्ही असे अनुक्रमे पारितोषिक देण्यात येणार आहे.

तीन गटातील तीन दुचाकी, तीन फ्रिज व तीन टीव्ही असे भेट देण्यात येणार असून सहभागी प्रत्येक महिलांना साडी भेट म्हणून देण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या युवती अध्यक्षा सुषमा संदीप बालवडकर यांनी सांगितले. सहभागी स्पर्धकांनी आपल्या घरातील गौरी व गणपतीचे फोटो 8010032061 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  राजमाता जिजाऊ जयंती लाल महाल येथे साजरी