सुतारवाडी मराठा सहाय्यक समितीच्या माध्यमातून 4 000 मराठा बांधवांसाठी गूळ शेंगदाणा पॅकेटची मदत

सुतारवाडी : सुतारवाडी पाषाण मराठा सहाय्यक समितीच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत. यासाठी सुतारवाडी ग्रामस्थांतर्फे गुळ व शेंगदाण्याची पाकिटे तयार करण्यात आली आहे.

आझाद मैदान मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांना ही मदत पोहोचवण्यात येणार आहे. 2000 पाकीट तयार करण्यात आली आहेत. सुतारवाडी परिसरातील महिला व मराठा बांधवांनी मंदिरामध्ये मदत एकत्रित जमा करत पॅकेट तयार केले आहेत.

सुमारे 4000 मराठा बांधवांना गुळ शेंगदाणे पुरतील एवढे खाद्यपदार्थ पॅकेज तयार करून पाठवण्यात येणार आहे.

See also  आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया अधिक  सुलभ,पारदर्शक असावी - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील