अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या प्रसारासाठी मेळाव्याचे आयोजन

पुणे :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुणे व सातारा कार्यालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंतय पोहोचविण्याकरिता मंगळवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे मातंग व तत्सम समाजातील समाजबांधवांकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, बार्टी विभाग प्रमुख अनिल कारंडे, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी मांजरे, महामंडळाचे सातारा जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक श्री. म्हस्के यांनी केले आहे. कार्यक्रमात बीजभांडवल योजनेंतर्गतऑटोरिक्षांसाठी ७ लाख रुपयांचे वितरण प्रातिनिधीक स्वरुपात तीन लाभार्थ्यांना करण्यात आले.

मेळाव्यात पुणे, सातारा जिल्ह्यातील मातंग समाजातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, व समाजबांधव यांनी योजना राबविण्यातील समस्या मांडल्या. या संदर्भात महामंडळ आणि बार्टीच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

See also  पाषाण येथे पंढरपुरच्या श्री.विठ्ठलांच्या पालखी-रथाचे यंदाचे मानकरी आमले यांच्या बैलजोडीची पुजा संपन्न.