रिक्षा चालक मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ गठीत होणार :- उदय सामंत

पिंपरी : महाराष्ट्रातील विसलाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उद्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय प्राधान्याने घेऊन तातडीने रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ गठित करण्याचे कारवाई केली जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रिक्षा चालक मालकांच्या शिष्टमंडळास दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे एका महत्त्वाच्या विषयासाठी उद्योग मंत्री उदय सामंत हे आले असता यावेळी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले व रिक्षा चालक-मालकांच्या कल्याणकारी मंडळा संदर्भात चर्चा केली असता त्यांनी हे आश्वासन दिले असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती व देशव्यपी फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली,

बाबा कांबळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालकांनसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी रिक्षा चालक मालकांनी केली जात आहे, यासाठी अनेक आंदोलने व मोर्चा देखे रिक्षा चालक मालकाने काढले होते. त्याची देखील सरकारने आता कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली आहे परंतु याची अंमलबजावणी व्हावी, रिक्षा चालक मालकांना इलेक्ट्रिक रिक्षासाठी अनुदान मिळावे मुक्त रिक्षा परवाना बंद व्हावा यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी कृती समिती व नॅशनल ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने, महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे, या वेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रिक्षा चालक मालक संघटनांसाठी कल्याणकारी मंडळ गठित करण्याचे आश्वासन दिले.

See also  आमदार महेश लांडगे यांनी मराठा आंदोलकांवरील हल्ल्याबाबत देखील तत्परता दाखवायाला हवी होती: प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे