नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत परिसराची पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून पाहणी

पुणे : स्वच्छ पुणे अभियान अंतर्गत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परिसरामध्ये पाहणी केली.

यावेळी संदीप कदम उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, माधव जगताप, मा.उपायुक्त परिमंडळ क्रमांक १, श्रीमती शीतल वाकडे, मा. महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे सह संबंधित सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक ,आरोग्य निरीक्षक व मुकादम तसेच ह्यूमन मॅट्रिक्स ची संपूर्ण टीम इत्यादी उपस्थित होते.

यावेळी मा.महापालिका आयुक्त यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे अनुषंगाने सर्व उपस्थित यांना स्वच्छ पुणे अभियान यशस्वीपणे पार पाडण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. मा.महापालिका आयुक्त यांनी या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करण्यासाठी बैठक घेण्याचे आदेशित केले व त्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर बैठक घेण्यात आली.

See also  महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान - अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार