यश्विन 2.0 सोसायटी सुस येथे “राईट टू वोट” जनजागृती व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे गणेशोत्सवानिमित्त आयोजन

सुस : सुस येथील यश्विन 2.0 सोसायटीमध्ये यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा होत आहे. सोसायटीतील सर्व रहिवासी आणि सांस्कृतिक संघ चे सदस्य एकत्र येऊन विविध कार्यक्रमांमध्ये मनापासून सहभाग घेत आहेत. या उत्सवामध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे सुंदर आयोजन करण्यात आले आहे.

“राइट टू वोट” या उपक्रमाअंतर्गत, ज्या रहिवाशांकडे सोसायटीच्या पत्त्यावर मतदार ओळखपत्र नाही, अशा नागरिकांसाठी घरोघरी जाऊन Voter ID नोंदणी व पत्ता बदलाची प्रक्रिया राबवली जात आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक Voter ID तयार करण्यात आले असून, आणखी ५० हून अधिक अर्ज प्रक्रियेत आहेत.

उत्सवात टॅलेंट शो, नृत्य स्पर्धा, चित्रकला, भाषण व प्रश्नमंजुषा स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी व पारंपरिक खाद्यपदार्थ स्पर्धा, फनफेअर व स्टॉल्स, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम स्पर्धा यांसारखे विविध कार्यक्रम भरविण्यात आले आहेत. यंदाच्या फूड कॉम्पिटिशनसाठी ऑर्किड इंटरनॅशनल हॉटेलचे जनरल मॅनेजर हे परीक्षक म्हणून उपस्थित होते.

प्रत्येक वर्षीप्रमाणे हरे कृष्णा कीर्तन व आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले असून, हरे कृष्णा चे प्रभु कुरुनंदन दास व त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्तीमय वातावरण निर्माण केले. महिला वर्गाच्या वतीने भजनसंध्याचे आयोजन, अथर्वशीर्ष पठण करण्यात आले होते.

यश्विन 2.0 सोसायटी सांस्कृतिक संघ चे सदस्य गणेश विसर्जनाची संपूर्ण व्यवस्था सोसायटी मधेच करतात. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, १००० हून अधिक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यश्विन 2.0 सोसायटीमधील हा गणेशोत्सव केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक जाणीव निर्माण करणारा आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारा ठरला आहे अशी माहिती श्री राघवेंद्र जी देशपांडे यांनी दिली.

See also  मावळ्याच्या वेशात घोड्यावर स्वार होत उमेदवारी अर्ज दाखलमहाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांच्या रॅलीची शहरात चर्चा