बालेवाडी : गणेशोत्सवानिमित्त माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली.
गणपती बाप्पाच्या दर्शनावेळी दादांनी पुणेकरांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली. मंडपातील भक्तिभावाने सजलेले वातावरण आणि गणरायाचे मनोहर रूप यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचे अमोल बालवडकर यांनी सहकुटुंब मनःपूर्वक स्वागत केले. त्यांच्यासोबत बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील भाजपा नेते, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच अमोल बालवडकर फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























