पैशाला पवित्रतेचा स्पर्श झाला की त्याचा उल्लेख लक्ष्मी असा होतो – चंद्रकांत महाराज वांजळे, योगीराज पतसंस्थेच्या वार्षिक सभेत 15 टक्के लाभांश जाहीर

बाणेर : पैशाला पवित्रतेचा स्पर्श झाला की त्याचा उल्लेख लक्ष्मी असा होतो. संचालक सभासद व कर्मचारी यांच्या आपुलकीच्या भावनेतून संस्था वाढत असते असे चंद्रकांत वांजळे महाराज यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी ते बोलत होते. चंद्रकांत वांजळे महाराज, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, भानुप्रताप बर्गे, शंकरराव सायकर, ह.भ.प.संजय बालवडकर, राजेंद्र मुरकुटे, राजेंद्र विधाते, बाळासाहेब काशीद, अलका शिरसगे, वैशाली विधाते, रंजना कोलते, निकिता माताडे, रामदास मुरकुटे, दत्तात्रय तापकीर, रवी घाटे, संजय बालवडकर, अमर लोंढे, ॲड. रानवडे, गणेश तापकीर, अनिल बालवडकर, पांडुरंग कदम, पंढरीनाथ गायकवाड, प्रदीप नेवाळे,दत्तात्रय गगणे, आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले, योगीराज पतसंस्थेने शिक्षणासाठी एक मुलगी दत्तक घेतली असेच राज्यभर एका संस्थेने एक मुलगी दत्तक घेतली तर समाजामध्ये चांगले बदल पाहायला मिळेल. पतसंस्था सर्वाधिक लाभांश देत असून पतसंस्थेने यंदाच्या वर्षी तीन कोटी 84 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक कार्यातून देखील पतसंस्था नावारूपाला येत आहे.

यावेळी नवीन तज्ज्ञ संचालकांचा, दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पतसंस्थेने यावेळी १५ टक्के लाभांश जाहीर केले. तसेच पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा “योगीराज जीवनगौरव पुरस्कार” यंदाच्या वर्षी धार्मिक क्षेत्रात काम करणारे ह.भ.प. चंद्रकांत वांजळे महाराज यांना जाहीर करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक, सदस्य व नागरीक उपस्थित होते.

See also  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्यपुतळा सोमवारी दुपारी कोसळला