सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भुषण गवई यांच्यावर करण्यात आलेल्या, भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भुषणजी गवई यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.

आंदोलन प्रसंगी आपल्या भाषणात अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘चप्पल भिर्रकावणारी प्रवृत्ती नक्की कोणती आहे? ही तीच प्रवृत्ती आहे जीणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक नाकारला, ही तीच प्रवृत्ती आहे ज्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले आणि दगडांचा मारा केला, ही तीच प्रवृत्ती आहे ज्यांनी आगरकर जिवंत असताना त्यांची अंतयात्रा काढली आणि ही तीच प्रवृत्ती आहे ज्यांनी शाहू महाराजांचा वेदोक्ताचा अधिकार नसल्याचे ठणकावून सांगितले.

हा हल्ला केवळ व्यक्तीवरचा किंवा पदावरचा नसून भारताच्या संविधानावर आणि सामाजिक समतेवर झालेला हल्ला आहे. हल्लेखोर खुलेआम आपल्या कृत्याचे समर्थन social media मधून करत आहे हे त्याहूनही दुर्दैवी आहे. हा न्यायव्यवस्थेला जाणीवपूर्वक धमकावण्याचा प्रयत्न असून हल्लेखोरावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच या कृतीमागे अन्य कोणाचा हात नाही ना, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.’’

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, राजेंद्र भुतडा, तानाजी निम्हण, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्राची दुधाणे, अनिता धिमधिमे, सिमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्‍हाळ, ॲड. राजश्री अडसुळ, अनुसया गायकवाड, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, द. स. पोळेकर, राजेश मोहिते, अनिल पवार, अविनाश अडसुळ, रवि पाटोळे, ॲड. शाबीर खान, ॲड. निलेश बोराटे, विनय ढेरे, ऋषीकेश बालगुडे,  सुनिल घाडगे, विल्सन चंदवेळ, चेतन पडवळ, संतोष सुपेकर, अमित कांबळे, सद्दाम शेख, ॲड. नंदलाल धिवार, राकेश नामेकर, सुरेश चौधरी, वीराज सोंडकर आदींसह असंख्य काँग्रेसजण सहभागी होते.

See also  आयटी पार्क हिंजवडी मधील विविध समस्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी, रस्ते अडवणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा केल्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश