पुणे :- सैनिकी मुलांच्या-मुलींच्या वसतिगृहाकरिता अशासकीय कर्मचाऱ्यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, इतर नागरिकांनी १० जुलैपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करावेत.
पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षक ४ (पुरूष), मानधन २३ हजार २८३ रुपये, स्वयंपाकी ९ (महिला) मानधन १२ हजार ९६२ रुपये, सफाई कर्मचारी ३ (महिला/पुरूष), मानधन १२ हजार १२७ रुपये, माळी १ (महिला/पुरूष) मानधन १२ हजार १२७ रुपये तसेच नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षिका ३ (महिला), मानधन २३ हजार २८३ रुपये, स्वयंपाकी ७ (महिला) मानधन १२ हजार ९६२ रुपये, सफाई कर्मचारी २ (महिला), मानधन १२ हजार १२७ रुपये, माळी १ (महिला/पुरूष) मानधन १२ हजार १२७ रुपये अशी पदे भरण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल (भ्र.ध्व. क्र. ७०२०४१०९५४) आणि वसतिगृह अधीक्षिका वर्षाराणी कांबळे (भ्र.ध्व. क्र. ९१५६२०३०४५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस.डी. हंगे (नि.) यांनी केले आहे.