पुणे : पुणे महानगरपालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र आणि राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्राच्यावतीने ०१ – ०७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “वन्यजीव सप्ताह” आयोजित करण्यात आला.
या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १०३० विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत स्पर्धकांसाठी विशेष गट तयार करण्यात आले होते. ज्या स्पर्धकांनी स्पर्धेत स्थान मिळवले त्यांच्यासाठी पारितोषिक वितरण करणेकरीता आज दि. ०९/१०/२०२५ रोजी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला.
“वन्यजीव सप्ताह २०२५” च्या समारोप समारंभा दरम्यानच्या विजेता विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिक यांना पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण रवि पवार, उप आयुक्त पर्यावरण विभाग, पुणे महानगरपालिका तसेच डॉ. संतोष मुळे, परिमंडळ आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका आणि आश्विनी यादव, एज्युकेशनल ऑफिसर, पुणे महानगरपालिका यांचे हस्ते करण्यात आले.
स्पर्धकांचे गट/विषय
१) १ली – ४थी – माझा आवडता प्राणी/वनस्पती
२) ५वी – ७वी – निसर्गचित्र/ परिसंस्था
३) ८वी – १२वी – पर्यावरणीय प्रदूषण आणि परिणाम
४) UG/PG/नागरिक – शाश्वत विकासाकडे वाटचाल
सर्व स्पर्धांतील सर्व सहभागीसाठी ऑनलाईन पद्धतीने सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.