मुंबई : उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालय येथे सुपूर्त करण्यात आला. बँकेच्या वतीने १ कोटी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार २५ लाख ५१ हजार रुपये आणि संचालक मंडळाचा सभाभत्ता १ लाख रुपये असे एकूण १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून देण्यात आली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याआधीही विविध आपत्तीच्या काळात सामाजिक जबाबदारी जपत मदतीचे कार्य केले आहे. यानिमित्तानं बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी आमदार व संचालक दिलीप मोहिते, संचालक भालचंद्र जगताप, श्री. विकासनाना दांगट, श्री. सुरेश घुले, श्री. प्रविण शिंदे, श्री. संभाजी होळकर, संचालिका सौ. निर्मलाताई जागडे, कु. पूजा बुट्टे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिरुद्ध देसाई, उपमुख्य व्यवस्थापक श्री. समीर रजपूत, सेवक संघाचे प्रतिनिधी श्री. अजितराव जाधवराव, युनियन प्रतिनिधी श्री. संजय पायगुडे, श्री. रविंद्र जोशी, तसेच श्री. अतुल साळुंखे (खाजगी सहाय्यक) आणि सेवक संचालक श्री. राजेंद्र शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.