पुणे : मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग मालमत्तेबाबतचा मुरलीधर मोहोळ यांचा खुलासा हा अत्यंत ढोबळ,तांत्रिक स्वरूपाचा आहे . पूर्वी गोखले एलएलपी नावाने भागीदारी मध्ये व्यवसाय सुरू केलेला होता, ही बाब यात महत्त्वाची असून असे धर्मादाय संस्थांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे, विकण्याचे प्रकार जुनेच आहेत.
मुख्य प्रश्न हा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नगरनियोजनाच्या दृष्टीने अनेक प्रकारच्या सार्वजनिक सुविधा असणे गरजेचे असते. त्यामुळेच अशा बाहेरगावातील विद्यार्थी होस्टेल्स ची सोय असणे उलट ती वाढवणे हे गरजेचे आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणत असताना या राहण्याच्या जागा कमी करून त्याचा वापर व्यापारी पद्धतीच्या बांधकामांसाठी करणे अयोग्य.
त्यामुळे सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून धर्मादाय आयुक्त मार्फत हा करार रद्द करणे भाग पाडावे. हाच आग्रह खासदार मोहोळ यांनी पण फडणवीस यांच्याकडे करावा असे वागणे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
घर ताज्या बातम्या जैन बोर्डींग प्रकरणांमध्ये धर्मादाय आयुक्तांमार्फत करार रद्द करण्याची आग्रह खासदार मुरलीधर मोहोळ...