बाणेर मध्ये दिवाळी फराळाच्या माध्यमातुन विशाल गांधिले यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

बाणेर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ व बाणेर बालेवाडी परिसरातील प्रभावी कार्यकर्ते विशाल गांधिले यांनी दिवाळी फराळाच्या माध्यमातुन जोरदार शक्ती प्रदर्शन करत आगामी निवडणुकांमध्ये आपली दावेदारी प्रबळ असल्याचे व्यक्त केले. या कार्यक्रमाला परिसरातील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच सोसायट्यांचे पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

विशाल गांधिले आयोजित दिवाळी फराळ सोहळ्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम कुंदन गार्डन, बाणेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला  ३,००० हुन अधिक नागरिक उपस्थित होते. सुगम संगीत कार्यक्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आमदार शंकर मांडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह सचिन भोसले, प. महाराष्ट्र प्रांत धनंजय काळे, विद्यापीठ भाग कार्यवाह मा.संजय वाघुळदे, सहकार्यवाह मा. सारंग वाबळे, राजाभाऊ सुतार उपस्थित होते.

समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, नगरसेवक बाबुराव चांदेरे, संतसेवक मारूती कोकाटे, हभप दिलीप रणपिसे, राहुल बालवडकर, सनी निम्हण, ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, नगरसेवक सुशील मेंगडे, प्रमोद निम्हण, गणेश वर्पे, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, प्रकाश द. बालवडकर, पांडुरंग कळमकर, बालिंग ताम्हाणे, राजेश विधाते, दत्तात्रय तापकीर, अमर लोंढे, विजय विधाते, रामदास विधाते, राजेंद्र मुरकुटे,जयेश मुरकुटे, संतोष तापकीर, नितीन शिंदे, समीर चाकणकर, अंकुश पाडाळे, बाळासाहेब रानवडे,सुहास निम्हण, शैलेश कदम, जवाहर ढोरे, बाळासाहेब अमराळे, सतिश बहीरट, सचिन मानवतकर, शांताराम पाडाळे पाटील, सोपानराव पाडाळे, सिद्धार्थ रणवरे, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, संतोष जगदाळे, रमेश ठोसर, लक्ष्मण सायकर, बबनराव चाकणकर, सुधाकर धनकुडे,अर्जुन शिंदे, अर्जुन ताम्हाणे, अर्जुन ननावरे, आनंदा कांबळे पाटील, सागर बालवडकर, जितेंद्र कोळेकर, अनिकेत मुरकुटे, प्रकाश कि. बालवडकर, शरद भोते, विशाल विधाते, वामन कोळेकर, बाळासाहेब पाडाळे, बाळासाहेब खैरे, निलेश पाडाळे, सुहास भोते, शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, प्रकाश तापकीर, युवराज कोळेकर, पांडुरंग पाडाळे, पै. समीर कोळेकर, दत्ता कळमकर, राजेंद्र कळमकर, काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे पाटील, चंद्रकांत जाधव, सुभाष भोळ, अनिकेत चांदेरे, मयुर भांडे, कल्याणी टोकेकर, वैशाली कमाजदार, वंदना सिंग, उमा गाडगीळ, वृषाली साठे, नितीन रणवरे, राकेश पाडाळे, विनायक चिव्हे, अजिंक्य निकाळजे, अभिजीत केदारी, जवाहर केदारी, झानेश्वर पारखे तसेच परीसरातील जेष्ठ नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  राज्याच्या युवा धोरण समितीत सनी विनायक निम्हण यांची नियुक्ती

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, म्हाळुंगे, सुस आणि सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने आणि सहभागातून सशक्त जनसंपर्काचे उदाहरण ठरला आहे.