बावधन पाषाण  रस्ता चांदणी चौक येथून सुरू होऊन संरक्षण विभागाच्या हद्दीपर्यंत ३६ मीटर डीपी रस्ता रुंदीकरणासाठी अतिरिक्त आयुक्तांची पाहणी

बावधन : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बावधन पाषाण हा रस्ता चांदणी चौक येथून सुरू होऊन संरक्षण विभागाच्या हद्दीपर्यंत ३६ मीटर असा डीपी रस्ता आहे. पश्चिम उपनगरातील राहणारे नागरिक यांच्या करिता असणारा असा हा रस्ता असल्याने डीपी प्रमाणे पूर्ण क्षमतेने रुंदीकरण होण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री.ओमप्रकाश दिवटे सर यांनी महानगरपालिकांच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांचे समवेत पाहणी केली.

यावेळी मालमत्ता विभागाचे मा.उपायुक्त श्री.प्रशांत ठोंबरे, भूसंपादन विभागाचे मा.उपायुक्त श्री. निखिल मोरे, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता, उपअभियंता, बांधकाम विभागाचे उप अभियंता, ड्रेनेज विभागाचे उपअभियंता, कोथरूड बावधन चे क्षेत्रीय अधिकारी असे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या रस्त्याच्या लांबीपैकी बहुतांश लांबी ही एफएसआय टीडीआर च्या माध्यमातून मनपाच्या ताब्यात आलेली असून ताब्यात आलेल्या जागेच्या ठिकाणी पूर्ण ३६ मीटर रस्ता करणे बाबत सूचना मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी पथ विभागास दिल्या. तसेच वन विभागातील साधारणतः ४० गुंठे जागा ही रस्ता रुंदीकरणांमध्ये येत असून सदरची जागा ताब्यात घेण्यासाठी मा.जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठपुरावा चालू असून डिसेंबर महिना अखेरपर्यंत सदरची जागा ताब्यात घेणे बाबतच्या स्पष्ट सूचना यावेळी मा.अतिरिक्त  महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या आहेत. यावेळी रस्ता विकसित करताना ड्रेनेज लाईन त्याचबरोबर पावसाळी ड्रेनेज लाईन यांचीही कामे समांतर रितीने करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

See also  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्यावतीने 'निर्मलवारी' उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी