सांगली : बाबा… तुमच्या लेकीने आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. केवळ सांगलीकरच नाही; तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. आज टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्मृती मंधाना आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे. ह्या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवसणी घालेल. त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील आणि यातून देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
घर ताज्या बातम्या बाबा…. तुमच्या लेकीने इतिहास घडवला! केवळ सांगलीकरांनाच नव्हे देशवासियांनाही अभिमान, टीम इंडियाची...






















