खडकवासला धरण परिसरातील  पाणलोट क्षेत्र आणि हिंगणे परिसरातील कालव्यालगत अतिक्रमण केलेल्या मिळकतींवर पाटबंधारेची कारवाई

खडकवासलाः खडकवासला धरण परिसरातील  पाणलोट क्षेत्रा लगत आणि शहरातून जाणाऱ्या हिंगणे परिसरातील कालव्यालगत अतिक्रमण केलेल्या  तीसहून अधिक मिळकतींवर आज कारवाईला सुरुवात करण्यात आली. पुढील चार दिवस अतिक्रमणित मिळकतींचे निष्कासन होईपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  दरम्यान स्थानिक व्यावसायिकांकडून या कारवाईचा तिव्र विरोध केला असून पाटबंधारे विभाग प्रशासनाकडून अतिक्रमणे काढण्यात दुजाभाव केला जात असल्याचा  आरोप केला आहे.

पानशेत धरण क्षेत्रालगाच्या पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून मागील काही वर्षांपासून धरण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मागील आठवड्यातच अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन कारवाईची पूर्व सूचना देण्यात आली होती.  त्यानंतर अतिक्रम धारकांनी राजकीय नेते व वरिष्ठांपर्यंत  संपर्क साधून  सदर कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र प्रशासन कारवाईच्या भूमिका ठाम राहिल्यानंतर आज कारवाईचा पहिला हातोडा खडकवाडला धरण चौपाटीवर पडला चौपाटी परिसरातील तब्बल वीस टपऱ्या आणि बांबूचे छताची अतिक्रमणे पाटबंधारे खात्याच्या अतिक्रमविरोधी पथकाने जमीन दोस्त केली. काही प्रमाणात व्यावसायिकांनी विरोध केला मात्र प्रशासन कारवाईवर ठाम राहिल्यानंतर व्यवसायिकांना सदर अतिक्रमे काढून घेण्यासाठी पथकाने सहकार्य केले. चौपाटीनंतर या पथकाने आपला मोर्चा परिसरातील सर्वात नावाजलेल्या अक्वेरिअस हॉटेलकडे वळवून तेथील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू केली जवळपास दोन एकर क्षेत्रावरचे अतिक्रमण हटवीण्यात आले .

स्थानिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर अतिक्रमावर धरण तीरावरील अतिक्रमणांकडे पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आणून दिले त्यानंतर पाटबंधारे खात्याने अधिक जोर दिला. खडकवासला धरणाचे जलाशयाच्या लगतच्या असंख्य अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात असून मोठ्या पक्की बांधकामे झाल्याचे निदर्शन आणून ती का काढत नाही असा सवाल केला असता पाटबंधारे विभागाकडून आम्ही सर्वच अतिक्रमणे काढण्याच्या तयारीने आलो असुन ती देखील काढणार असल्याचे स्पष्ट केल्याने व्यवसायिकांचा विरोध काहीसा मावळला. दुपारनंतर पाटबंधारे खात्याने पुढे बाहुली रस्ता परिसरातील धरण किनारे लगत अतिक्रमानांकडे आपला मोर्चा वळवला असून आज सायंकाळपर्यंत मोहीम चालू होती. पुढील तीन दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या खडकवासला धरण शाखेच्या अभियंता गिरजा कल्याणकर फुटाणे आणि मूठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांच्याकडून सांगण्यात आले. खडकवासला परिसरातील जवळपास सर्वच  अतिक्रमण काढण्याची मोठी कारवाई आजच झाल्याचे दिसून आले. दरम्यान स्थानिक व्यावसायिकांकडून या कारवाईचा तिव्र विरोध केला असून पाटबंधारे विभाग प्रशासनाकडून अतिक्रमणे काढण्यात दुजाभाव केला जात असल्याचा  आरोप केला आहे.

See also  कोथरूड येथील दिलजीत दोसांझ च्या म्युझिकल कॉन्सर्टला चंद्रकांत दादा पाटील यांचा विरोध

अतिक्रमण कारवाईसाठी हिंगणे येथील कालवा आणि  खडकवासला धरण परिसरात पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारवाईसाठी पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागा नेही मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध करून दिली होती.