पुणे ग्रामीण दक्षिणमधील नगरपरिषद निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्या आंबेगाव पुणे येथे बैठका

आंबेगाव, पुणे : भारतीय जनता पार्टीच्या पुणे ग्रामीण दक्षिणमधील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात  पुण्यातील आंबेगाव येथे नगरपरिषदनिहाय बैठका घेत उमेदवार निवडी आणि निवडणूक रणनीती याविषयी सविस्तर चर्चा केली.

बैठकीस पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,  प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे जिल्हा भाजपा दक्षिण निवडणूक प्रभारी आमदार ॲड. राहुल कुल, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्यासह जिल्हा कोअर कमिटीचे सदस्य, नगरपरिषद निवडणूक संचालन समितीचे पदाधिकारी-सदस्य या बैठकांना उपस्थित होते.

यावेळी फुरसुंगी, सासवड, जेजुरी, भोर, इंदापूर, बारामती या नगरपरिषदांचा तर माळेगाव या नगरपंचायतीचा स्वतंत्र आणि सविस्तर आढावा घेतला. भारतीय जनता पार्टी-महायुतीचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेवर कायम राहावा, हा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

See also  मतदान केंद्रातील बदलाबाबत मतदारांना अवगत करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे