खडकवासला : खडकवासला परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित उज्जैन महाकाल यात्रेतील 3000 महिला भगिनींना ओळखपत्र वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात पुणे शहर संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी खडकवासल्याच्या “श्रावण बाळ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा नेते संदीप मते पाटील यांचे कौतुक करत नागरिकांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
अहिर म्हणाले की, खडकवासला व प्रभागामध्ये संदीप मते यांनी केलेल्या लोकाभिमुख उपक्रमांमुळे त्यांच्या नेतृत्वाची स्पष्ट छाप पडली आहे. “अशा समाजकारण करणाऱ्या युवा नेतृत्वाला जनतेचा आणि पक्षाचा मोठा आशीर्वाद मिळायला हवा. आपल्या आशीर्वादाने खडकवासला प्रभागाला एक योग्य, परिश्रमी आणि जनतेसाठी झटणारा युवा नगरसेवक पाहायला मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी महापौर स्नेहलताई आंबेकर यांनी संदीप मते यांच्या संघर्षमय कार्याची महती सांगितली.. असा कष्टकरी शेतकरी कुटुंबातील नेता जनतेसाठी काहीतरी करतोय हे तुम्हा आमच्यासारखेचे भाग्य आहे. ते नगरसेवक निश्चितपणे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात आयोजक संदीप मते यांनी बोलताना प्रभागातील माता-भगिनींसाठी महाकाल यात्रा आयोजित करण्याचा घेतलेला संकल्प सांगितला. ते म्हणाले, “महाकाल यात्रा हा माझा जनसेवेचा संकल्प आहे. आज पहिल्या टप्प्यात 3000 भगिनींना ओळखपत्र दिले असून, एकूण 10,000 महिलांना उज्जैन दर्शन घडविण्याचा माझा संकल्प आहे.ते पुढे म्हणाले.“आजवर 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वावर काम केले. यापुढेही प्रभागातील जनतेसाठी कटिबद्ध राहणार आहे.”
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती. पुणे शहर संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, महिला संपर्क प्रमुख व माजी महापौर स्नेहलताई आंबेकर, राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, संजय काळे, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण,माजी नगरसेवक बाळासाहेब धनवडे, ज्योती गाडे, अनिताताई इंगळे, भरत कुंभारकर, संतोष गोपाळ, अविनाश बलकवडे, रवी मुजुमले, बुवा खाटपे, पोपट चोरघे, डॉ. नंदकुमार मते,तृप्ती पोकळे, गोकुळ करंजावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ नेत्या लक्ष्मीबाई मते आणि शारदाताई मते यांनी शिवसेनेत प्रवेश करून महत्त्वपूर्ण राजकीय संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीन दादा वाघ यांनी केले.






















