कोथरूड परिसरामध्ये सराईत  चोरट्यांकडून लॅपटॉप व तीन दुचाकी हस्तगत

कोथरुड  : कोथरूड परिसरामध्ये कोथरूड पोलिसांनी सराईत चोरटयाकडून लॅपटॉप सह ३ दुचाकी हस्तगत करत एकाला अटक केली.


दरम्यान उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड येथील धनलक्ष्मी सोसायटीचे फ्लॅटचे उघडया दरवाजावाटे अज्ञात चोरटयाने प्रवेश
करून एकुण ३८,५००/- रु. कि. मुद्देमाल ( लॅपटॉप, मोबाईल, व ॲपरन) चोरी केल्याने अज्ञातचोरटयाविरुध्द कोथरुड पो. ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने,  यांचे मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरटयाचा शोध घेण्याचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी सपोनि, बालाजी सानप व पो.ना. ज्ञानेश्वर मुळे, व पो.शि. तेजस चोपडे, पो.शि. आकाश वाल्मिकी यांनी घटनास्थळाचे तसेच आजु बाजुचे परिसरातील कॅमेरे चेक करून आरोपी अमित सुभाष मोरे, वय ३१ वर्षे, रा. विश्वशांती चौक, केळेवाडी, पुणे यांस निष्पन्न करून आरोपीचे ताब्यातून एकुण ८०,०००/- रु. कि. मुद्देमाल त्यामध्ये ( ३ दुचाकी, १ लॅपटॉप,)
असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तपासादरम्यान खालीलप्रमाणे एकूण ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) कोथरुड पो. ठाणे, गुरनं- १३०/२०२४ भादवि कलम ३८०
२) पौड रोड पो. ठाणे, पुणे ग्रामीण गुरनं- १९९ / २०२४ भादवि कलम ३७९
३) कोथरुड पो. ठाणे, पुणे शहर गुरनं- १०/२०२४ भादवि कलम ३७९
४) कोथरुड पो. ठाणे, पुणे शहर गुरनं- ८८ / २०२४ भादवि कलम ३७९
वरीलप्रमाणे गुन्हे तपासादरम्यान उघड झाले असून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व दुचाकी हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त सो, श्री. संभाजी कदम यांचे अधिपत्याखाली मा.सहायक पोलीस आयुक्त सो, भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सो, संदीप देशमाने, पोलीस
निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंग कदम, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी बालाजी सानप व पथकातील अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, आकाश वाल्मिकी, संजय दहिभाते, शरद राऊत, विष्णु राठोड, अजय शिर्के, मंगेश शेळके यांनी  कामगिरी केली आहे.

See also  विठूरायाच्या ओढीने पंढरपुरकडे पायी निघालेल्या लाखो महिला वारकर्यांसाठी ‘आरोग्य वारी’