बाणेर-पाषाण मध्ये गीता जयंतीनिमित्त तुला-दान,सत्संग राहुल कोकाटे मित्र परिवाराचा उपक्रम

पाषाण : भगवान श्रीकृष्णनाने अर्जुनास महाभारताच्या रणांगणावर भगवत गीता ज्ञान देऊन विश्वरूप दर्शन दिले तो दिवस म्हणजे मोक्षदा एकादशी, त्या निमित्ताने इस्कॉन परिवार व राहुलदादा कोकाटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे गीता जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

भजन, प्रवचन, गीता दान, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्रीमद्भगवत गीतेच्या पवित्र जयंतीनिमित्त आयोजित ‘भव्य गीता जयंती सोहळा’ ISKCON च्या विशेष सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला. धर्म, कर्म आणि मोक्षाचे ज्ञान देणाऱ्या या महान ग्रंथाच्या जयंती सोहळ्यात सहभागी होताना एक अलौकिक अनुभव आला.भजन सेवा, कीर्तन आणि मंत्रोच्चाराने वातावरण पूर्णपणे भक्तीमय झाले होते.

या कार्यक्रमाला प्रभू कनई ठाकुर दास,हल्दर प्रियदास,ब्रिजेश पांडे,प्रशांत चौधर,योग गूरु राजकिशोर त्रिपाठी यांनी उपस्थित राहून श्रीकृष्णाच्या ज्ञानाचे आणि आशीर्वादाचे भागीदार झालेल्या सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. मयुरीताई कोकाटे,उत्तम जाधव, प्रवीण आमले,आदित्य ठाकणे,अभिजित देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले
हरे कृष्ण!

See also  इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला