पुणे : पुणे पुस्तक महोत्सवात साकेत प्रकाशन या प्रकाशन संस्थेतर्फे श्रीमती अरुणा कळसकर यांच्या ‘प्रथम क्रमांकाचे निवडक निबंध’ या पुस्तकाची सातवी आवृत्ती आणि ‘उत्कृष्ट भाषणे’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे सुप्रसिद्ध लेखिका आराधना कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
“एखाद्या पुस्तकाची सातवी आवृत्ती निघणे ही कौतुकाची बाब आहे”असे मत साकेत प्रकाशनच्या श्रीमती प्रतिमा भांड्यांनी प्रास्ताविकात मांडले. साकेत प्रकाशन दर्जेदार लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते असेही त्या म्हणाल्या. नुकत्याच या संस्थेने पन्नास वर्षे पूर्ण करून दोन हजारांपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत.
आराधना कुलकर्णी यांच्या सुप्रसिद्ध लेखक प्रेमचंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथांचा मराठी अनुवाद यासंदर्भात श्रीमती अरुणा कळसकर यांनी मुलाखत घेतली. या पुस्तक महोत्सवात दररोज साकेत प्रकाशन संस्था, वाचक- लेखक भेट घडवण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यक्रमाला उपस्थित सर्व वाचक प्रेमींचे प्रतिमा भांड यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
























