अर्थमंत्रीपद गेल्यापासून फडणवीस यांना तुमच्या कामाचा अंदाज नसावा, आम आदमी पार्टीची टीका

पुणे : चार चाकी गाड्यांना महाराष्ट्रात टोल बंद झालेला असून सरकार त्याची भरपाई टोल कंपन्यांना देते अशी माहिती काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या बाबत जनतेमध्ये आश्चर्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

‘ही अत्यंत धक्कादायक माहिती असून फडणवीस यांचा जमिनीवरचा संपर्क सध्या तुटला असावा किंवा अर्थमंत्री पद गेल्यापासून त्यांना टोल कमाईचा अंदाज नसावा. एकट्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर दीड लाखाच्या जवळपास वाहने रोज ये जातात करतात व प्रत्येकी चार चाकी गाडीकडून 320 रुपये टोल जमा केला जातो. या सर्व टोल ची माहिती एम एस आर डी सी च्या वेबसाईटवर आहे. राज्याचे परिवहन मंत्री हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने त्यांनी सर्व गाडी वाल्यांनी फास्टटॅग काढून टाकावेत का हे स्पष्ट करावे? सामान्य नागरिक खळखट्यात करणार नाही म्हणून त्यांना तुम्ही कितीही आणि कसेही लुबाडणार आहात का? टोल च्या झोलाची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी तातडीने पैसे परत देणे सुरू करावे.’ अशी मागणी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

See also  विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ