बाणेर : बाणेर येथील मुरकुटे परिवाराच्या वतीने येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे शूज बाणेर पाषाण प्रभाग नऊ मध्ये निवडणूक लढवणार आहेत. जयेश मुरकुटे यांना पूर्ण ताकदीने साथ देत निवडून आणण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
बाणेर येथे मुरकुटे परिवारातील सदस्य व नातेवाईक यांची बैठक पार पडली. मुरकुटे परिवारातील ज्येष्ठ व युवक अशा सर्व सदस्यांनी एकत्र येऊन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक विकास, पारदर्शक कार्यपद्धती आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या जयेश मुरकुटे यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
या निर्णयामुळे बाणेर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाला बळकटी मिळणार असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत जयेश मुरकुटे यांच्या विजयासाठी मुरकुटे परिवार सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बाणेर परिसरातील मुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























