सोमेश्वरवाडीच्या विकासाला चालना देणारा ३० मीटर रुंदीचा रस्ता सचिन दळवी यांच्या प्रयत्नातून पूर्ण

पाषाण : सोमेश्वर वाडी (बाणेर) येथील सोमेश्वर वाडी ते ऐवेरी इस्टेट मुख्य बाणेर रस्ता दरम्यानचा ३० मीटर रुंदीचा विकास आराखडा (डीपी) रस्ता अखेर पूर्ण करण्यात आला असून, हा प्रकल्प सचिन दळवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरीत्या मार्गी लागला आहे.

या रस्त्याच्या कामासाठी सोमेश्वर वाडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समन्वयाने कार्य करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देताना स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने हा प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होऊ शकला.
३० मीटर रुंदीचा हा डीपी रस्ता सुरू झाल्यामुळे सोमेश्वर वाडी, बाणेर, पाषाण आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने वाहतूक कोंडी कमी होणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. तसेच आपत्कालीन सेवा, शालेय वाहतूक, व्यावसायिक व दैनंदिन दळणवळणासाठीही हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

यासोबतच या रस्त्यामुळे परिसरातील नागरिक सुविधा, पायाभूत विकास, तसेच भविष्यातील नागरीकरणाला चालना मिळणार आहे. सोमेश्वर वाडी परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा टप्पा ठरत असून, स्थानिक विकासाच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड मानला जात आहे.

या विकासकामाबद्दल स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी सचिन दळवी तसेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार व्यक्त केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे परिसराच्या विकासासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

See also  ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने कलाकारांना दिवाळी सरंजाम वाटप