‘संवाद आपुलकीचा’ उपक्रमांतर्गत सचिन दळवी व लक्ष्मी सचिन दळवी यांचा सुस सुतारवाडी पाषाण परिसरात प्रचार सुरू

पाषाण : सुस बाणेर पाषाण प्रभाग क्र. ०९ मधील सुस व पाषाण येथे “संवाद आपुलकीचा” या उपक्रमांतर्गत मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी संवाद दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलचे सरचिटणीस सचिन दळवी आणि भाजपा नेत्या लक्ष्मी सचिन दळवी यांच्या वतीने राबविण्यात आला.

या संवाद दौऱ्यादरम्यान घरोघरी जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासासंबंधी सूचना ऐकून घेण्यात आल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपली मते मांडली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मतदारांशी आपुलकीचा संवाद वाढवणे, त्यांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष माहिती घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणे हा आहे. नागरिकांनीही या संवाद दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रश्न मोकळेपणाने मांडले.

“संवाद आपुलकीचा” या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यातील थेट संवाद अधिक दृढ होईल, तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सूस व  सुतारवाडी परिसरात सचिन चिंतामण दळवी व सौ. लक्ष्मी सचिन दळवी यांनी दौऱ्यात  घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.

सचिन दळवी यांना सोमेश्वरवाडी ग्रामस्थांनी बैठक घेऊन एक मुखी पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दौऱ्या दरम्यान नागरिकांच्या कडून देखील या निर्णयाचे स्वागत केले जात असून पाठिंबा दर्शवला जात आहे. या गाव भेट दौर्‍यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केला जात आहे.

See also  निकालाची टक्केवारी सुधारण्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना यश