संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर पदोन्नती

पुणे : पिंपरी-चिंचवड शहराचे सुपुत्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव आयएएस संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर पदोन्नती झाली. भोंडवे यांनी आपल्या कार्यकाळात सहा राष्ट्रीय आणि दहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत.

२००७ बॅच चे आय.ए.एस. अधिकारी असलेले श्री. संकेत भोंडवे यांची सह-सचिव पदावर नुकतीच पदोन्नती झाली. संकेत भोंडवे यांनी आपल्या कार्यकाळात सहा राष्ट्रीय आणि दहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. प्रशासकीय सेवेचे कार्य त्यांनी मध्यप्रदेश केडरमधून सुरु केले असून ते प्रतिभाशाली अधिकारी म्हणून एक दशकाहून जास्त काळ त्यांनी आपल्या कामाचा ठसा देशभर उमटविला आहे. तरुणांना प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास असून त्यांनी आपल्या अनेक व्यख्यानांमधून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. सध्या ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली येथे मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उद्यान अधीक्षक स्व. शांताराम भोंडवे यांचे ते सुपुत्र असून वडिलांच्या त्रिसूत्री कामाचा वसा घेऊन पुण्याचे नाव देशभर रोशन करीत आहेत हि पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

See also  समाज कल्याण विभागामार्फत 'वॉक फॉर संविधान' चे उत्साहात आयोजन