निवडणुकीपुरते नव्हे, तर कायम जनतेसोबत असलेले नेतृत्व अमोल बालवडकर

बाणेर : नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही गेल्या तीन वर्षांपासून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अखंडपणे कार्यरत असलेल्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी समाजाभिमुख कामाची आपली ओळख कायम ठेवली आहे. पद असो वा नसो, नागरिकांच्या सेवेला प्राधान्य देत स्वखर्चातून विविध उपक्रम राबवत ते सातत्याने प्रभागात सक्रिय आहेत.

हाती घेतलेले कोणतेही काम अर्धवट न ठेवता पूर्णत्वास नेण्यावर अमोल बालवडकर यांनी कायम भर दिला आहे. नागरिकांनी ज्या विश्वासाने आणि अपेक्षेने त्यांची निवड केली होती, त्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देत प्रामाणिक व परिणामकारक प्रयत्न करण्यात आले. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे प्रभागातील पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन प्रश्न. पुढील किमान ३० वर्षे नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी २४x७ पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबवून प्रभागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात आला आहे. यासोबतच नदी सुधारणा प्रकल्पही त्यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागत असून, हा प्रकल्प येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्वच्छ नदी आणि शुद्ध पाणी यामुळे निरोगी समाजनिर्मितीला चालना मिळून रोगराईपासून मुक्त व आरोग्यदृष्ट्या सक्षम परिसर घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे.

आगामी काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक महत्त्वाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी उद्यानांची उभारणी, दर्जेदार खेळाची मैदाने विकसित करणे, तसेच खराब झालेले फुटपाथ सुस्थितीत आणून सुरक्षित व सुकर वाहतुकीची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येणार आहे. दरम्यान, “मिशन निर्मल” ही अभिनव आणि प्रेरणादायी संकल्पना त्यांनी सुरू केली आहे. या उपक्रमासाठी स्वयंसेवकांची स्वतंत्र फौज उभी करण्यात आली असून, अवघ्या ९० दिवसांत सुमारे ९० किलोमीटर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता जनआंदोलन व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.कामातून विश्वास निर्माण करण्याला सदैव प्राधान्य देणाऱ्या या नेतृत्वामुळे प्रभागाच्या उज्ज्वल भवितव्याची हमी मिळत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

See also  खडकवासल्यात  उमेदवारी बाबत महाविकास आघाडीत नाराजी, इच्छुक अपक्ष लढण्याच्या तयारीत