बाणेर टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात बालगोपालानी घेतला चित्रकलेचा आनंद..

बाणेर : वसुंधरा अभियान बाणेर येथील संस्थेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन तुकाई टेकडी बाणेर येथे निसर्गरम्य वातावरणात करण्यात आले . संस्थेचे हे आयोजनाचे दहावे वर्ष आहे.

वृक्षारोपण, निसर्ग संवर्धन, रक्तदान शिबिर त्याचबरोबर दरवर्षी मोठ्या प्रमाणात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यात आजूबाजूच्या परिसरातील शेकडो मुले टेकडीवर चित्रकला स्पर्धेसाठी जमा होतात. यात सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांसाठीच ही चित्रकला स्पर्धा वेगळीच ऊर्जा देऊन जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण यात आवडीने भाग घेतात आणि आपली कला कागदावर उतरवतात. कडाक्याच्या थंडीतही 500 हून अधिक मुलांनी आणि पालकांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. तुकाई टेकडीवर जणू मेळाव्याचे स्वरूप आले होते. स्पर्धेचा निकालही तात्काळ लावण्यात आला. 

यामध्ये गटाप्रमाणे प्रथम क्रमांक श्रवण सुरेश बावधने, माही दीपक दराडे, सुनील काटे तसेच द्वितीय क्रमांक अवनीश विकास वाघमारे, मायरा चौधरी, सानिका सलगर तसेच तृतीय क्रमांक प्रिया किशोर चौधरी, आयांश अरुण बोथे, समृद्धी प्रकाश सोनटक्के तसेच उत्तेजनार्थ मल्हार सदावर्ते, वीरा गांजेकर, अर्जुन मीनल यांना बक्षिस वितरित करण्यात आले. परीक्षक म्हणून खेमचंद खैरनार, कामिनी खैरनार, पल्लवी महाजन, श्रीकांत शिंपी, चंद्रशेखर टिळेकर, सुवर्णा टिळेकर, विशाल खैरनार यांनी काम पाहिले.
वसुंधरा अभियान च्या वतीने मुलांना मोफत चित्रकला कागद आणि नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली तसेच अभियानाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे सर्व नियोजन करण्यात आले.

See also  आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक