रविराज काळे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संघटक, राज्यसभा खासदार संदीप फाटक यांचे हस्ते संपन्न

दिल्ली : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष रविराज काळे यांच्या 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संघटक, राज्यसभा खासदार संदीप फाटक यांचे हस्ते संपन्न.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष  मा. रविराज काळे यांनी नुकतीच दिल्ली येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि पक्ष विस्तार आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा केली.


यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय करता येईल? यावर विचारविनिमय करुन आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष मा. रविराज काळे यांनी आपल्या कार्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सादर केला. दरम्यान, यावेळी  रविराज काळे यांच्या 2025 या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संघटक तथा राज्यसभा खासदार संदीपजी पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पार्टीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अजितजी फाटके साहेब , अभिजीत मोरे सर, मुकुंदजी किर्दत, युवक प्रदेशाध्यक्ष मयुर जी दौंडकर, अमितजी मस्के यांसह राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

See also  आप नेते खासदार संजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर