सुस : सुस बाणेर पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी एकत्र येत सुस मधील गावठाण परिसरामध्ये तसेच सोसायटी परिसरामध्ये प्रचार केला. सुस मधील काळभैरवनाथ मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराची एकत्रित सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
माजी नगरसेवक तानाजी निम्हण, बाळासाहेब भांडे, ज्योती चांदेरे, मयूर भांडे, महेश सुतार, संतोष तोंडे, जीवन चाकणकर, अशोक दळवी, नितीन चांदेरे, मंगेश निम्हण, संजीव भोते, स्वाती रणपिसे, स्वाती सुर्यवंशी, सुनीता रानवडे, अमोल फाले, चेतन निम्हण आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे परिचय पत्र यावेळी नागरिकांना देण्यात आले. सुस परिसरातील समस्या तसेच उपाययोजना याबाबत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर देत यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेतला.























