गुंजन चौक ते वाघोली चौक पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण कारवाई

नगररोड : नगररोड वॉर्ड ऑफिस अंतर्गत नगर रोड गुंजन चौक ते वाघोली वाघेश्वर मंदिर चौक येथे नगर रोड वॉर्ड ऑफिस व पीएमआरडीए अंतर्गत मोठ्या प्रमाणात जॉइंट अतिक्रमण कारवाई अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या आदेशानूसार, व
अतिरिक्त आयुक्त विशेष विकास ढाकणे नियंत्रणाखाली, उपायुक्त अतिक्रमण माधव जगताप , मा. उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती किशोरी शिंदे , सहायक आयुक्त नगर रोड वॉर्ड ऑफिस नामदेव बजबळकर, व बांधकाम, अतिक्रमणं, आकाश चिन्ह, उद्यान , पीएमआरडीए व इतर विभागांकडून-रोड, फुटपाथ, फ्रंट मार्जीन वरील अनाधिकृत शेड, हातगाडी,पथारिवाले,फळ, फूल, ऊसरस, चस्मे,टायर पंक्चर यांच्यावर मोठ्या प्रमाणात एकत्रित कारवाई करण्यात आली.
मोठ्या प्रमाणात अनाधिकृत साहित्य,हातगाड्या, छत्री, आइस क्रीम कुल्पी,गाड्या फुले, फळे इत्यादी जप्त करण्यात आले.
यापुढे ही अशीच कारवाई वेळोवेळी मुख्य नगर रोड वर- गुंजन चौक ते वाघोली व अंतर्गत वाहतुकीच्या गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्रित कारवाई करण्यात आली आहे. तसेच वारंवार नियमांचा भंग करून अनाधिकृत पणे रस्ता, फुटपाथ,फ्रंट मार्जीन मध्ये असे व्यवसाय करणारे विक्रेते यांच्यावर दंडात्मक व फौजदारी गुन्हे नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने सर्व संबंधित अनाधिकृत व्यवसायकानी नोंद घ्यावी असे आवाहन करीत आहोत ह्याबाबत प्रभारी महापालिका सहायक आयुक्त नगररोड वॉर्ड ऑफिस नामदेव बजबळकर यांनी माहिती दिली .
यावेळी २० शेड, ९ पथारी, ५४इतर, ४हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.

See also  गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन