बोपोडी : बोपोडी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अरुण भाऊ गायकवाड यांना आनंद छाजेड हेल्पलाईन ग्रुपच्या वतीने व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. हा उपक्रम सौ. सपना आनंद छाजेड यांच्या शुभहस्ते पार पडला.
समाजसेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अरुण भाऊ गायकवाड यांना दैनंदिन हालचाली सुलभ व्हाव्यात, या उद्देशाने ही व्हीलचेअर देण्यात आली. आनंद छाजेड हेल्पलाईन ग्रुपने गरजू नागरिकांच्या मदतीसाठी राबवलेल्या उपक्रमांपैकी हा एक महत्त्वाचा उपक्रम असून, समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचा संदेश यातून देण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आनंद छाजेड हेल्पलाईन ग्रुपच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत व्यक्त केले. अरुण भाऊ गायकवाड यांनीही या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत, ग्रुपचे व सौ. सपना आनंद छाजेड यांचे आभार मानले.
























