समाजाची गरज लक्षात घेऊन उपक्रम राबविण्याची आवश्यकता – ना. चंद्रकांत पाटील

कोथरूड : समाजाची गरज ओळखून उपक्रम राबविण्याची गरज असून जेथे जे पाहिजे तेच देता आले पाहिजे आणि तेच समाजकार्य क्रिएटिव्ह फाउंडेशन, ग्लोबल ग्रुप आणि सतीश गायकवाड मित्र परिवार करत आहे असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. सध्या साधनांची कमतरता नसून संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज असल्याचे सांगताना हे काम शिक्षकांच्या हातूनच घडू शकते आणि तेच भावी काळातील चांगले नागरिक घडवू शकतात, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी तत्पर असल्याचे ही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने कर्वेनगर येथील अभिजात एजयुकेशन सोसायटी च्या ग. रा. पालकर शाळेस शालेय साहित्य व क्रीडा साहित्य भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, श्री. सतीश गायकवाड, मा. नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, ग्लोबल ग्रुप चे राहुल बग्गा, मा. नगरसेवक जयंत भावे, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, शहर चिटणीस कुलदीप सावळेकर,प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,श्रीमती पालकर,प्रभाग 13 महिला मोर्चा अध्यक्ष संगीता शेवडे, महिला मोर्चा शहर चिटणीस सुवर्णा काकडे, राजस्थान आघाडीचे जयप्रकाश पुरोहित,विश्वजीत देशपांडे,प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, विठ्ठल मानकर, निलेश गरुडकर, राजेंद्र येडे, समीर ताडे, श्रीकांत गावडे, प्रतीक खर्डेकर इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेला क्रीडा तथा शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. यात हॅन्डबॉल, निशाण, डंबेलस सह चित्रकला वही, स्केच पेन, पट्ट्या, पेन्सिल व इतर साहित्य मुबलक प्रमाणात देण्यात आले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी, अमला भागवत, नलिनी शेंडकर यांनी त्याचा स्वीकार केला.संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, पूर्वा म्हाळगी यांनी सूत्रसंचालन तर भाजप क्रीडा आघाडी संयोजक प्रतीक खर्डेकर यांनी नमो चषक ची माहिती देत आभार प्रदर्शन केले.

See also  'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान