घरोघरी प्रचारातून जयेश मुरकुटेंना वाढता प्रतिसाद; नागरिकांचा ‘परिवर्तन’वर ठाम विश्वास

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे उमेदवार जयेश मुरकुटे यांनी सोसायटी परिसरात घरोघरी जाऊन प्रचारावर विशेष भर दिला असून, या थेट संवादातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी “आता परिवर्तन १००% होणार” अशी स्पष्ट भावना व्यक्त केली.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली अपेक्षित विकास न झाल्याची नाराजी, दैनंदिन समस्यांनी ग्रस्त नागरिक आणि अपुऱ्या सुविधा—या पार्श्वभूमीवर मतदार परिवर्तनाचा गंभीरपणे विचार करत असल्याचे या भेटीदरम्यान सातत्याने व्यक्त केले जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता आदी मूलभूत प्रश्नांबाबत नागरिकांनी आपली व्यथा मांडली.

या प्रचारात माजी नगरसेविका रंजना अशोक मुरकुटे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले. जयेश मुरकुटे यांची मुद्देसूद मांडणी, समस्यांची प्रभावी हाताळणी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची हातोटी यामुळे सर्वसामान्यांमधून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचे कौतुक होत असून, विश्वासार्ह नेतृत्वाची गरज अधोरेखित केली जात आहे. थेट संवाद, प्रामाणिक भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे जयेश मुरकुटे यांचा जनसंपर्क अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

See also  'हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री' - ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा घणाघात