महाळुंगे : महाळुंगे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले. या पदयात्रेदरम्यान स्थानिक प्रश्न, प्रलंबित विकासकामे तसेच भविष्यातील अपेक्षा यावर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर हे चौघेही उपस्थित होते. चौघांनीही नागरिकांची घरोघरी भेट घेत मतदारांशी संवाद साधत जनतेचा विश्वास अधिक दृढ केला.
या पदयात्रेला शांताराम पाडाळे (पोलीस पाटील), वामनराव कोळेकर, निलेश पाडाळे, सोपानराव खैरे, सुखदेव कोळेकर, विजय कोळेकर, नामदेवराव गोलांडे, युवराज कोळेकर, हरिश्चंद्र गायकवाड, जितेंद्र कोळेकर, राहुल दादा, किसन पारदे, काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, नंदकुमार पाडाळे, समीर कोळेकर, किसनराव सुतार, हरिश्चंद्र पाडाळे, रामराव पाडाळे, ज्ञानेश्वर पाडाळे, मनोज पाडाळे, धनराज निकाळजे, आनंदराव कांबळे, प्रकाश तात्या आणि अनिल तात्या यांची प्रमुख उपस्थिती होती. पदयात्रेमुळे महाळुंगे परिसरात राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.


























