औंध बोपोडी येथील भाजपाच्या दोनही नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

औंध : प्रभाग क्रमांक आठ औंध बोपोडी मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक बंडू ढोरे व भाजपा राज्य प्रवक्ते मधुकर मुसळे, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, माजी स्वीकृत सदस्य बाळासाहेब रानवडे, रणपिसे यांनी राजकीय घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

यामुळे भाजपा विरुद्ध मागील वेळी भाजपा मधून निवडणूक लढवलेले माजी नगरसेवक अशी काहीशी स्थिती या प्रभागात निर्माण झाली आहे. मागील वेळी अर्चना मधुकर मुसळे, बंडू ढोरे, विजय शेवाळे हे भाजपाचे उमेदवार होते. विजय शेवाळे यांच्या निधनानंतर अर्चना मुसळे व बंडू ढोरे हे भाजपाचे प्रतिनिधी होते ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाल्याने आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मध्ये चुरशीची लढत निर्माण झाली आहे. बाळासाहेब रानवडे यांनी यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक लढवली होती ते परत स्वगृही दाखल झाले आहेत.

तर भाजपाची कमान आता नव्या शिलेदारांवर अवलंबून आहे. व महाविकास आघाडीचे उमेदवार देखील ताकतीने रिंगणात उतरणार असल्याने प्रभाग क्रमांक आठ औंध बोपडीची लढत ही तिरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सध्या पक्षांतराचा खेळ राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

See also  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे पुस्तक महोत्सवाला सदिच्छा भेट