खडकवासला विधानसभा मतदार यादीच्या कामास वेग; अंतिम मतदार यादी तयार करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या वर्किंग कॉपी कक्षाचे काम जोरात सुरू असून, अंतिम यादी तयार करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह समन्वय साधून मतदार यादीची छपाई करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. यामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अंतिम मतदार यादी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुस्पष्टता कायम राहील.


मतदार यादीची मार्क कॉपी तयार करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, नोंदणीकृत मतदारांची अचूक माहिती निश्चित करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून प्रत्येक टप्प्यात आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या घेतले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे आणि नोडल अधिकारी रोहन भोसले

See also  व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ईडब्लूएस,एसईबीसी,ओबीसी मुलींना उच्च शिक्षणाच्या शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के  सवलत