राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सैनिकी हॉस्पिटल येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात संपन्न.

खडकी: पॅरालॉजिक रहेब सेंटर येथील सैनिकी हॉस्पिटल मधील वीर योध्यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने महिला कार्यकर्त्यांनी प्रत्येक जवानांना औक्षण करीत राखी बांधून पेढे गोडधोड पदार्थ भरवीत रक्षाबंधन हा सण मोठ्या आनंदात साजरा केला. या वेळी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी देणारे कर्नल महादेव घुगे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ‘बाई पण भारी देवा’ यातील गायिका श्रावणी महाजनी तसेच रेडिओ पुणेरी आवाजाच्या गायिका वैश्वि पवार आवर्जून उपस्थित होत्या. तसेच इतर मान्यवर महाराष्ट्र व्यावसायिक अध्यक्षा डॉ. तृप्ती रमाने ओम शांतीच्या दीदी तेजस्विनी, दिव्या दीदी, योगिता दीदी, रेश्मा दीदी, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी उपाध्यक्ष विजय जाधव, सह संयोजक राष्ट्रवादी चिटणीस शशिकांत पांडुळे, उद्योजक योगेश शेलार, काँग्रेसचे नेते इंद्रजित भालेराव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

हॉल मधील उपस्थित सर्व जवानांना आलेल्या सर्व भगिनींनी राखी बांधून आपण एकटे नाही आहात आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत असेच दर्शवित आनंद साजरा केला. अशीच काही परिस्थिती सर्व वीर जवानांची झाली होती प्रत्येक जण आपल्या हाताकडे पहात अभिमानाने आमच्या साठी आपण आहात हे दर्शवित होते. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णाताई पांडुळे, पुष्पा निघोजकर, उमा सोंडूर, शुभांगी थापा यांनी विशेष परिश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव, आभार शशिकांत पांडुळे यांनी मानले.

See also  स्वस्त दरात मिळेल रेती, घरकुलांना मिळेल गती!