सुस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधून जयेश मुरकुटेंचा राष्ट्रवादी (शरद पवार)कडून उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : सुस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधील ९ ब ओबीसी पुरुष जागेसाठी जयेश मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरीत्या अर्ज सादर केला.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ९ ब प्रभागातील लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाणेर परिसरात तरुण नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे जयेश मुरकुटे यांनी कमी कालावधीत सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर सक्रिय काम करत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक प्रभावी व सक्षम उमेदवार म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयेश मुरकुटेंच्या उमेदवारीमुळे सुस–बाणेर– पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, या गटातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

See also  शिवसेना शाखा सुतारवाडी व सन वाईन प्रीस्कूल च्यावतीने वृक्षरोप वाटप