सुस : सुस येथील यशवीन सोसायटीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी नागरिकांशी अत्यंत आपुलकीचा, सकारात्मक आणि उत्साहवर्धक संवाद साधला. या भेटीदरम्यान झालेल्या प्रत्येक चर्चेतून प्रभागाबाबतच्या अपेक्षा, विश्वास आणि भविष्यासाठीचा आशावाद स्पष्टपणे जाणवत होता.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला. यावेळी उपस्थित नागरिकांना चौघांनाही मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
सोसायटीतील नागरिकांनी प्रभागात आतापर्यंत झालेली विकासकामे, सातत्याने राबविलेले उपक्रम तसेच लोकांशी असलेली जवळीक यांचा उल्लेख करत ठामपणे पाठिंबा जाहीर केला. “प्रभागातील विकासकामे आणि तुमची लोकांशी असलेली नाळ पाहता आमचा पाठिंबा नेहमीच तुमच्यासोबत राहील,” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
नागरिकांकडून मिळालेला हा विश्वासपूर्ण आणि मनाला स्पर्श करणारा प्रतिसाद पाहून आतापर्यंत केलेल्या कामांचे समाधान मिळाल्याचे उमेदवारांनी सांगितले. नागरिकांचा प्रेमळ पाठिंबा आणि आपुलकीची साथच पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची नवी ऊर्जा व प्रेरणा देत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
























