चंद्रकांत अण्णा भरेकर मित्र परिवारातर्फे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री म्हसोबा देवस्थानच्या प्रांगणात गेली 21 वर्ष अव्याहतपणे सुरू असणारा बिगर हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी श्री म्हसोबा देवस्थान खारवडे या ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता गोरज मुहूर्तावर  संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यामध्ये एकूण१७ वधू-वरांचे विवाह संपन्न झाले. चंद्रकांत भरेकर मित्र परिवार आणि श्री म्हसोबा देवस्थान खारवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी असा विवाह सोहळा आयोजित केला जातो.या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत सुमारे 750 पेक्षा जास्त विवाह संपन्न झाले आहेत.

यासोबतच आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच शिवव्याख्याते श्री.श्रीमंत कोकाटे यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.विवाहित जोडप्यांना आयोजकांतर्फे संसार उपयोगी वस्तू  भेट म्हणून देण्यात आल्या. वधूवरांच्या पालकांकडून एकही रुपया न घेता आयोजित केलेल्या

या दिमाखदार विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे  सदस्य माननीय शांताराम इंगवले, श्रीक्षेत्र म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुराताई भेलके व मुळशी तालुक्यामधील आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत अण्णा भोरेकर यांनी उपस्थितांचे  आणि विवाह मध्ये सहभागी झालेल्या वधू-वरांचे आभार मानले. जि प सदस्य शांताराम इंगवले यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.मदन व्हावळ यांनी सोहळ्याचे निवेदन केले.अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न झाला.

See also  ए.आय.एस.एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात महिलांसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन