पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेरमध्ये पूनम विशाल विधाते व प्रमोद अण्णा निम्हण यांचे शक्तीप्रदर्शन

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये बाणेर परिसरात आज प्रचार दौऱ्याचे प्रभावी शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सौ. पूनम विशाल विधाते आणि प्रमोद अण्णा निम्हण यांनी प्रचार दौऱ्यास सुरुवात केली.

या प्रचार दौऱ्यादरम्यान बाणेर गावठाण ते विधाते वस्ती या परिसरात घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, वीज, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. उमेदवारांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत नागरिकांच्या सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.

या दौऱ्याला महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. ठिकठिकाणी घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहपूर्ण वातावरणात नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले. नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रेम व विश्वास पाहता बाणेर परिसरात झालेला हा प्रचार दौरा एक प्रभावी शक्तीप्रदर्शन ठरला.

यावेळी बोलताना सौ. पूनम विशाल विधाते म्हणाल्या,“प्रभागातील प्रत्येक घटकाचा समावेश असलेला विकास, महिलांचे सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास ही आमची खरी ताकद आहे.”
तर प्रमोद अण्णा निम्हण यांनी सांगितले,“पारदर्शक, जबाबदार कारभार आणि नियोजनबद्ध विकास हाच आमचा अजेंडा आहे. बाणेर परिसराचा विकास प्रत्यक्ष कामातून दिसेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत ‘कप-बशी’ व ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. नागरिकांनी व्यक्त केलेला पाठिंबा आणि दिलेला विश्वास हीच पुढील वाटचालीची खरी प्रेरणा असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.

See also  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाणेर-बालेवाडी -सुस महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ; संविधानाचे केले सन्मानपूर्वक पूजन व अभिवादन