बाणेर : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे) येथे अपक्ष उमेदवार पूनम विशाल विधाते व मा. श्री. प्रमोद आण्णा निम्हण यांनी सुस, बाणेर, बालेवाडी, महाळुंगे व पाषाण परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये भेटी देत प्रचारसभा व संवाद बैठकांचे आयोजन केले.
“पक्ष नव्हे, जनतेचा माणूस… सत्ता नव्हे, सेवेचा संकल्प…” या भूमिकेतून उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक, क्रीडांगणे व उद्यानांच्या विकासासंदर्भातील समस्या आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी नागरिकांसमोर प्रमोद निम्हण व सुषमा निम्हण यांनी नगरसेवक असताना केलेल्या बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा, क्रीडांगणे, पाषाण तलाव सुशोभीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड, सुसज्ज रस्ते, समाज मंदिर विविध विकासकामांची माहिती मांडण्यात आली. तसेच पूनम विधाते यांनी “वामा” संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी राबवलेल्या सामाजिक व सक्षमीकरणाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, कपबशी चिन्हासमोरील बटन दाबून पूनम विधाते व शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून प्रमोद निम्हण यांना मतदान करून स्वतःच्या हक्काचा प्रतिनिधी प्रचंड बहुमतांनी विजयी करावा.
प्रभागातील विशेषतः सोसायटी वर्गातून अपक्ष उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत असून, जनतेतून सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.



























