सतत नवीन शोध हाच यशाचा मार्ग आहे : उद्योजक व शिक्षण तज्ज्ञ यांच्या कार्यशाळेचा मंत्र

पुणे : गणेशखिंड येथील पी ई सोसायटीचे मॉडर्न महाविद्यालय, येथे ‘इंडस्ट्री एक्स्पर्ट मीट 2026’ संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे उदघाट्न डॉ अरविंद शाळीग्राम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ब्रिगेडीअर श्री वसंत पवार व श्री मनीष पाटील इंनोव्हरसिटी, डॉ आनंद महाळुंगकर, सद्गुरू ऑटोकंपो्नेंट्स प्रा ली व पी ई सोसायटीचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख यांच्या हस्ते झाले.

प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ संजय खरात म्हणाले, “आपण विचारांची पद्धत थोडी बदलूया आणि मेजर आणि मायनार या मध्ये न अडकता विध्यार्थ्यांना इंडस्ट्री साठी तयार करूयात. त्यासाठी महाविद्यालयातर्फे केला गेलेला हा प्रयत्न आहे.”

या प्रसंगी बोलताना प्रा. शामकांत देशमुख म्हणाले, “स्वायत्त महाविद्यालयामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करायला थोडी मुभा मिळालेली आहे. यामुळे कौशल्य-आधारित अभ्यासक्रम इंडस्ट्री बरोबर वैचारिक देवाण-घेवाण करून आपण निश्चित करू शकतो. आम्ही महाविद्यालये एक पाऊल पुढे आलो आहोत. ईडस्ट्रीने पण पुढे येऊन सहकार्य करावे.”

डॉ अरविंद शाळीग्राम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, इंडस्ट्री आणि शिक्षण यामधील दरीं भरून काढणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्ता ही स्पर्धात्मक असावी आणि या कार्यशाळेमुळे ती निश्चित वाढेल.

पॅनेल डिस्कशन मध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.
श्री मनीष पाटील, श्री सुधनवा कोपर्डेकर, श्री सुभाष लोडे, श्री प्रकाश निकम, श्री आनंदसागर शिराळकर, श्री ओमप्रकाश शर्मा या तज्ञांनी चर्चा केली.तसेच श्री अविजीत पांडे, श्री अजिंक्य किणीकर, श्री प्रवीण गाडेल्ली यांनी आर्टिफिशिअल इंतिलिजिन्स तर श्री बिपीन देवकर व श्री सुमेध मोखले यांनी कॉमर्स
डॉ मिताली मोरे, ऍग्रीकल्चर सौं वैशाली पाटकर व श्री रवींद्र सिन्हा : सामाजिक भान तर रसायन शास्त्र व फार्मसी डॉ नामदेव घुले व श्री चेतन देवरे, सौं वर्षा जेजुरकर व डॉ अभिलाष नायर आणि डॉ मधुरा विप्र यांनी लाईफ सायन्स व बायो टेकनॉलॉजि यावर या तज्ञांनी मार्गदर्शन केले.

See also  मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ; सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे - खासदार अॅड. वंदना चव्हाण

सूत्रसंचालन प्रा मनीषा माटेगांवकर व चैताली मकाशीर-कोरान्ने यांनी केले.या मीटसाठी 17 महाविद्यालयातून 1300 विध्यार्थी आले.या कार्यशाळेचे आयोजन डॉ विनय कुमार व प्रा पराग शाह यांनी केले तर समन्वय डॉ सतीश अंबिके व डॉ संगीता ढमढेरे – राव यांनी केले.डॉ जोस्त्ना एकबोटे, सहकार्यवाह, पी ई सोसायटी यांनी व प्राचार्य डॉ निवेदिता एकबोटे उपकार्यवाह पी ई सोसायटी यांनी अभिनंदन केले. डॉ गजानन एकबोटे,कार्याध्यक्ष, पी ई सोसायटी यांच्या मार्गदर्शन मुळे हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.