“सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल” -अनिल परब

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना साई रिसोर्ट प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे कोर्टाने हे प्रकरण डिसमिस केल्याचं अनिल परब यांनी म्हटले आहे. त्यावर आता अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर संताप व्यक्त केला आहे.

दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी आमची चौकशी केली. गेले दीड वर्षे याप्रकरणात माझी नाहक बदनामी करण्यात आली. याबाबत मी माझ्या बदनामीचा खटला हायकोर्टात दाखल केला आहे. सुरूवातीपासून या प्रकरणात काही तथ्य नसल्याचं सांगत आलो आहे. परंतु नेहमीप्रमाणे सोमय्या माझ्यावर खोटे आरोप करीत राहिले. त्यामुळे आता त्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल, किंवा १०० कोटींचा दावा केलाय ते १०० कोटी द्यावे लागेल असं अनिल परब यांनी सांगितले आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, काही प्रकरणे अंगलट येत असल्याचं समजताच सोमय्या पळ काढतात. हरीत लवादात हे प्रकरण सुनावणीला आलं तेव्हा हा प्रकरणात काही तथ्य नाही. आम्ही हे प्रकरण डिसमिस करत आहोत असं जेव्हा न्यायमूर्तींनी सांगितलं तेव्हा आपली अबुू जाईल या भितीने किरीट सोमय्या यांनी ही याचिका मागे घेतली आहे.

See also  सुसगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दिलीप मुरकुटे यांच्या वतीने ३२ महिला भगिनींचा 'महिला सन्मान पुरस्कार' देउन गौरव