बालेवाडीत होळीमध्ये VSR कंपनीच्या विमानाचे प्रतीकात्मक दहन; चौकशीला गती देण्याची मागणी

पुणे : भूमाता कृषी मंचच्या वतीने बालेवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर VSR कंपनीच्या विमानाचे होळीमध्ये प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यावेळी संबंधित कंपनीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

होलिका दहनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी “होलिका मातेसमोर दुर्गुणांचा व वाईट विचारांचा विनाश व्हावा” अशी प्रार्थना केली. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा, तसेच चौकशीमध्ये होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर यांनी प्रशासनावर सवाल उपस्थित केले.

यावेळी गोसेवक संजय बापू बालवडकर, भूमाता कृषी मंचचे जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर, श्री शिवराज मित्र मंडळचे अध्यक्ष अशोक बालवडकर, संदीप बालवडकर, प्रगतशील शेतकरी राजेश चव्हाण, चंद्रशेखर बालवडकर, जालिंदर भंडारी, राजू कविटकर तसेच शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती कारवाई करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

See also  महेश काळेंचा स्वरसाज,लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे 'सुर संध्या'ने बहरली दिवाळी