पुणे : HDFC लाईफ इन्शुरन्स च्या वेस्टर्न पुणे शाखेत महिला दिना निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यममधील गणेश वंदनेने झाली. त्यानंतर आरोग्य व वेलनेस विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी बाणेर, बालेवाडी व पाषाण परिसरातील सरिका थिगळे, मेघना भंडारी, हेमलता कानडे, कल्याणी टोकेकर, वर्षा केळकर, डॉ. प्रिया देशपांडे, स्वाती भंडारकर आणि वृषाली चाकणकर यांचा विविध क्षेत्रातील कार्यासाठी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.





















